Ad will apear here
Next
‘विवेकानंद’मध्ये कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये ‘बी. व्होक., ग्राफिक्स डिझाइन विभाग’ आणि पुणे येथील ‘आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी’च्या वतीने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’ या विषयावर शनिवारी, १५ जुलै रोजी सशुल्क एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत ही कार्यशाळा होईल. प्रथमच अशी कॉन्फरन्स विवेकानंद कॉलेजमध्ये होत आहे. हस्तशिल्प कलाकारांच्या कलेला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. येथे कलाकारांना व्यवसायविषयक शिक्षण दिले जाईल. अशा प्रकारची देशातील ही एकमेव कार्यशाळा आहे.
 
यामध्ये कलाकारांना कलाकृती कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा हक्कांबाबत अॅड. गौरी भावे मार्गदर्शन करणार आहेत. ‘आर्ट अँड क्राफ्ट’ या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अक्षया बोरकर या ऑनलाइन व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी आणि फायदे-तोटे कसे हाताळावेत याबाबत मार्गदर्शन करतील.
‘आर्ट अँड क्राफ्ट’ ही संस्था एक बहुराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप कंपनी असून, गेली तीन वर्षे ती ललित आणि हस्तकला कारागिरांना दर्जेदार मार्केटिंग, सोशल मीडिया, वेब विकास सुविधा पुरवत आहे.

या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, सोलापूर आणि मुंबई येथील कलाकार, चित्रकार, जाहिरातदार, हस्तशिल्पकार सहभागी होणार आहेत. कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर आणि बी. व्होक. विभागाचे समन्वयक प्रा. सतीश गायकवाड  यांनी केले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZLKBE
Similar Posts
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे,
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या
‘विवेकानंद’मध्ये ‘जीएसटी’वरील कार्यशाळा कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत ‘भारतातील कररचना व जी.एस.टी.’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language